Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑक्टोबर ।। लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मिळवलेल्या यशानंतर अनेकांनी तुतारीची उमेदवारी मिळवी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. अशात शरद पवार यांच्या जवळचे असलेले माजी मंत्री राजेश टोपे यांनी पक्ष कोणाला उमेदवारी देणार याबाबतचे गणित मांडत माहिती दिली आहे.

दरम्यान राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील सर्वच पक्ष आणि आघाड्या तयारीला लागले आहेत. याचबरोबर निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असलेले उमेदवारही कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळू शकते याबाबत चाचपणी करत आहेत.

राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांनी उमेदवारी कोणाला देणार याबाबत बोलताना सांगितले की, “आम्हाला सत्ताधारी पक्ष म्हणून सरकार बनवायचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष निवडणून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांनाच तिकिट देण्याबाबत सावध आहे. त्यामुळे ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे, त्यालाच उमेदवारी मिळणार आहे.”

गेल्या वर्षी अजित पवार आणि 40 आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली तेव्हा पवारांबरोबर राहिलेल्या मोठ्या नेत्यांमध्ये राजेश टोपे यांचाही समावेश होता. त्यामुळे आता पक्षात टोपे यांचे स्थान मोठे झाले आहे.

दरम्यान लोकसभेत शरद पवार यांच्या पक्षाने फक्त 10 जागा लढवूनही 8 जागी विजय मिळवला आहे. त्यामुळे असंख्य ईच्छुकांचा ओढा तुतारीकडे आहे. इतकेच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील नेते आणि आमदारही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी रांगा लावत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूरातील कागलचे भाजप नेते समरजीत घाटगे यांनी तुतारी फुंगली होती. तर लातूरमधील भाजपच्या एका माजी आमदारानेही शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *