BSNL Sim Card Online : लवकरच घरबसल्या 90 मिनिटांत मिळणार BSNL 4G आणि 5G सिमकार्ड ; जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑक्टोबर ।। जियो, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया (Vi) यांच्या नुकत्याच वाढलेल्या दरांमुळे अनेक ग्राहक आता BSNL कडे स्विच करत आहेत. सरकारी दूरसंचार कंपनीने अलीकडेच जुलै 2024 मध्ये आंध्र प्रदेशात 217,000 नवीन कनेक्शन जोडून महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

देशभरात आपल्या 4G सेवांचा वेगवान विस्तार करणाऱ्या सरकारी दूरसंचार कंपनी BSNL आता 5G नेटवर्कवरही काम करत आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार, ऑक्टोबर अखेरपर्यंत 80,000 टॉवर उभारले जाणार असून, पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत उर्वरित 21,000 टॉवर उभारले जाणार आहेत.

याचा अर्थ, मार्च 2025 पर्यंत एक लाख 4G नेटवर्क टॉवर स्थापित केले जाणार आहेत. त्यांनी हेही सांगितले की, 5G सेवांसाठी विद्यमान 4G कोरवर 5G वापरणे शक्य आहे आणि टॉवरमध्ये आवश्यक बदल करण्याचे काम सुरू आहे.

BSNL द्वारे 4G आणि 5G सेवांच्या जलद विस्तारामुळे अनेक नवीन ग्राहकांना BSNL कार्यालयातून नवीन सिम कार्ड मिळवणे कठीण होत आहे. मात्र, इच्छुक ग्राहकांना BSNL सिम कार्ड ऑनलाईन ऑर्डर करण्याचा आणि घरी बसून ते मिळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

ऑनलाईन BSNL सिम कार्ड कसे ऑर्डर करायचे?
https://prune.co.in/ या वेबसाइटवर जा

‘Buy SIM card’ वर क्लिक करा आणि भारताची (country) निवड करा

तुमचा ऑपरेटर म्हणजेच BSNL निवडा आणि तुमची FRC योजना निवडा

सर्व आवश्यक माहिती आणि OTP भरा

तुमचा पत्ता द्या आणि स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा

पुढील 90 मिनिटांत सिम कार्ड तुमच्या घरी पोहोचेल. त्याचबरोबर ऑन-द-स्पॉट सक्रियकरण आणि डोअरस्टेप KYC देखील केले जाणार आहे. सध्या, हरियाणा (गुरुग्राम) आणि उत्तर प्रदेश (गाझियाबाद) या ठिकाणी BSNL साठी ही सेवा उपलब्ध आहे. BSNL 5G सेवा अद्याप प्रायोगिक टप्प्यात आहे. ऑनलाईन सिम ऑर्डर सेवा सध्या फक्त या निवडक शहरांमध्ये उपलब्ध आहे.लवकरच ही सुविधा देशभर उपलब्ध होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *