Dussehra 2024 : दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन बाजारात ‘धूम’! 150 चारचाकींचे बुकिंग, पंधराशेवर दुचाकी विक्रीचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ ऑक्टोबर ।। साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचे नागरिकांकडून नियोजन सुरु झाले आहे. यामुळे शहरातील वाहन बाजारात बुकिंगची धूम चालू असून, दीडशे चारचाकी वाहनांचे बुकिंग झाले आहे. तर पंधराशेपेक्षा अधिक दुचाकी विक्री होईल, असा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे. चारचाकी किंवा दुचाकी वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी या तिघांनाही प्रभावी पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक वाहनांकडे बघितले जाते. (Booking of 150 four wheelers in vehicle market on occasion of Dussehra )

बहुतांश कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात आघाडी घेतल्यामुळे त्यांनाही मागणी प्रचंड प्रमाणात आहे. याशिवाय वेगवेगळ्या कंपन्यांनी स्पोर्ट कार बाजारात आणल्यामुळे त्यांचीही क्रेझ ग्राहकांना दिसून येते. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत वाहन क्षेत्रात बुकिंगची ‘धूम’ असते. दसरा सात दिवसांवर आल्याने त्या दिवशी गाडी घरी नेण्याचे अनेक ग्राहकांनी नियोजन केले आहे. कागदपत्रांची पुर्तता करणे आत्तापासून सुरु झाले आहे.

जुन्या गाड्याची खरेदी-विक्री जोमात

गाडी खरेदी किंवा विक्री करण्यासाठी दसरा ते दिवाळी हा सर्वाधिक चांगला कालावधी समजला जातो. त्यामुळे वाहन बाजारातील जुन्या गाड्यांची खरेदी विक्री जोमाने होत आहे. (latest marathi news)

ई-बाईकला वाढती पसंती

दुचाकी वाहनांमध्ये विविध कंपन्यांनी दर १५ ते २० टक्के कमी केले आहेत. त्यात चार्जिंगची सुविधा उपलब्ध होत असल्याने ई-बाईक्सच्या मागणीत दुपटीने वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सद्य:स्थितीला ४०० गाड्यांचे बुकिंग झाले आहे. दिवाळीपर्यंत हा आकडा १ हजार २०० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये ई-बाईक्स विक्रीचे प्रमाण ५०० ते एक हजार एवढे होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *