Gold Price Today: सोन्या-चांदीची चमक उतरली ; ,पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ ऑक्टोबर ।। नवरात्रीच्या निमित्ताने आता सोन्याला सोन्याचे दिवस आल्याचे पाहायला मिळाले. नवरात्रीच्या दिवसांत आता सोने सतत वाढलेले पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींनी आतापर्यंतचा नवीन उच्चांक गाठला आहे. मोदी सरकारने आपल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात (बजेट) सोन्यावरील आयात शुल्क कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला. ज्यानंतर मौल्यवान धातू उच्चांकावरून प्रचंड घसरुन स्वस्त झाले मात्र आता सणासुदीला सोन्याने जोर पकडला आहे. आता आठवड्याची सुरुवात सोन्याचा भावात घसरण होऊन झाली आहे. साोन्याचा आजचा दर हा आता ७६,०६७ इतका आहे. चांदीच्या दरातही आज घसरण पाहायला मिळत आहे.

सराफा बाजारात सोन्याची किंमत
आता सणासुदीच्या दिवसात दागिने खरेही करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आतापर्यंत जोरदार कात्री बसत होती मात्र आता बसणार नाही. सणासुदीसोबतच आता लग्नाचा सीझन येणार असल्याने सराफा बाजारात दिवसागणीक सोन्याच्या किंमती नवनवीन उच्चांकच गाठणार आहे. जर सोने विकत घ्यायचा काही प्लॅन असेल तर आवर्जून घ्या कारण आता सोन्याचे दर कमी झाले आहेत. २४ कॅरेट सोन्याचा भाव ७७,४५० इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ७१,००० रुपये आहे. १ किलो चांदीची किंमत ही आज ९६,९०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

वायदे बाजारात सोन्याची किंमत
सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमती आज वाढली असून मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा बेंचमार्क ऑक्टोबर करार आज ७६ रुपयांच्या घसरणीसह ७६,००५ रुपयांवर उघडला. मागील बंद हा ७६,१४३ रुपयांवर झाला. आज सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमत मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर कराराची किंमत ही ७६,०६७ रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७१,००० रुपये ७१,२०० रुपये
पुणे ७१,००० रुपये ७१,२०० रुपये
नागपूर ७१,००० रुपये ७१,२०० रुपये
कोल्हापूर ७१,००० रुपये ७१,२०० रुपये
जळगाव ७१,००० रुपये ७१,२०० रुपये
ठाणे ७१,००० रुपये ७१,२०० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७७,४५० रुपये ७७,६७० रुपये
पुणे ७७,४५० रुपये ७७,६७० रुपये
नागपूर ७७,४५० रुपये ७७,६७० रुपये
कोल्हापूर ७७,४५० रुपये ७७,६७० रुपये
जळगाव ७७,४५० रुपये ७७,६७० रुपये
ठाणे ७७,४५० रुपये ७७,६७० रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *