महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ ऑक्टोबर ।। देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची तब्येत उत्तम असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी रात्रीपासून त्यांची प्रकृ्ती बिघडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र यावेळी प्रकृती उत्तम असल्याची माहिती स्वतः टाटा यांनी दिली आहे. टाटाचे सर्व्हेसर्वा रतन टाटा हे ८६ वर्षांचे असून नियमित तपासणीसाठी ते रूग्णालयात दाखल झाले होते.
नियमित तपासणीसाठी टाटा रूग्णालयात दाखल
माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अफवांची मला जाणीव आहे. पण ते सर्व दावे निराधार आहेत, याची मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो. वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे वैद्यकीय तपासणी करत आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. माझी प्रकृती सध्या ठणठणीत आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये.
Thank you for thinking of me 🤍 pic.twitter.com/MICi6zVH99
— Ratan N. Tata (@RNTata2000) October 7, 2024
सोशल मीडियावर पसरलेल्या बातमीनुसार, टाटा आंना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याचं वृत्त होतं. मात्र, स्वतः रतन टाटा यांनी त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट करून हे चुकीचं असल्याचं जाहीर केलं आहे.