![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑक्टोबर ।। केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रिय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महाभाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. या वेळी महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
सरकार महागाई भत्त ५४ टक्के करु शकतो. सध्या महागाई भत्ता ५० टक्के दिला जातो. त्यात वाढ केली जाणार आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ १ जानेवारी ते १ ऑक्टोबर या कालावधीत लागू होणार आहे. त्याचसोबत दिवाळी बोनस ऑक्टोबर महिन्याच्या पगारात येणार आहे.
कर्मचारी आणि पेन्शन धारकांना हा महागाई भत्ता मिळणार आहे. ऑल इंडिया कंज्युमर प्राइस इंडेक्सवर आधारित महागाई भत्ता असतो. जर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली तर ज्यांची बेसिक सॅलरी १८,००० रुपये आहे. त्यांनी महागाई भत्ता ९००० रुपयांत वाढ करुन ९,५४० रुपये मिळणार आहे. जर महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली तर ९,७२० रुपये मिळू शकतात.
ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्त्यात वाढ झाली तर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. सणासुदीच्या काळात त्यांना जास्त पैसे मिळणार आहे. देशातील १ कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता मिळणार आहे. (DA Hike)
सरकारचे सध्या लक्ष महागाई भत्ता वाढवणे आणि महागाई नियंत्रित करण्यावर आहे. परंतु सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्यावरदेखील चर्चा करत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आणि दसरा चांगला साजरा होणार असल्याचे दिसत आहे. (8th Pay Commission)
