Gold Silver Today Price : दसऱ्याच्या आधीच सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये घसरण ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑक्टोबर ।। नवरात्र उत्सवाला सुरुवात होताच सोन्यासह चांदीच्या किंमती वाढल्या होत्या. दररोज भाव वाढत होते. अशात आता दसऱ्याला अवघे २ दिवस शिल्लक आहेत. त्यात सोन्यासह चांदीच्या किंमती खाली घसरल्या आहेत. त्यामुळे तुम्ही आजच सोनं खरेदी करून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरी आणू शकता. त्यासाठी आजचा भाव नेमका कितीने कमी झाला आहे त्याची माहिती जाणून घेऊ.

२२ कॅरेट सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट सोन्याचा कमी झाला आहे. त्यामुळे आज तुम्हाला १ ग्रॅम सोन्यासाठी ७,११४ रुपये लागतील. ८ ग्रॅम सोन्यासाठी ५६,९१२ रुपये लागतील. एक तोळा सोन्यासाठी ७१,१४० रुपये लागतील. तर १०० ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला ७,११,४०० रुपये लागणार आहेत.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट सोन्यामध्ये १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,७५९ रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६२,०७२ रुपये आहे. तसेच १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७७,५९० रुपये आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,७५,९०० रुपये इतकी आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,८२,१०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ५८,२१० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४६,५६८ रुपये इतकी आहे. १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,८२१ रुपये आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव किती?

नवी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,११४ रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,७५९ रुपये इतका आहे.

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ७,०९९ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,७४४ रुपये इतकी आहे.

पुण्यात २२ कॅरेट सोन्याची किंमत ७,०९९ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,७४४ रुपये इतकी आहे.

लखनऊमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,११४ रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,७५९ रुपये इतका आहे.

जयपूरमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,११४ रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,७५९ रुपये इतका आहे.

कानपुरात २२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,११४ रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,७५९ रुपये इतका आहे.

नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ७,०९९ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,७४४ रुपये इतकी आहे.

नागपूरमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ७,०९९ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७,७४४ रुपये इतकी आहे.

चांदी कितीने स्वस्त झाली?
सध्या १००० ग्रॅम चांदी १०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे आजचा भाव ९५,९०० रुपये इतका आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये सुद्धा चांदीचा भाव असाच आहे. त्यामुळे आजचा भाव किती त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *