MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी; पात्रता फक्त १२वी पास; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑक्टोबर ।। सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी आहे. १२वी आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. या नोकरीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एसटी महामंडळात सहाय्यक, सुरक्षा रक्षक, शिपाईसह अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे.राज्य सरकारअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सहाय्यक, शिपाई. सुरक्षारक्षक, वायरमन, लिपिक, टंकलेखक पदे भरती केली जाणार आहे. १२वी/ITI/ पदवीधर उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.१८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत.

एसटी महामंडळात ४६ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरुन त्यांना भविष्यात नोकरी मिळेल.

या नोकरीसाठीचे ठिकाण पुणे असणार आहे.या नोकरीसाठी एम्प्लॉयमेंट नोंदणी कार्ड, शैक्षणिक गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, बँक पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्ड आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी. त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. यानंतर तुम्हाला मेल किंवा फोनद्वारे माहिती दिली जाईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *