महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑक्टोबर ।। टाटा समूहाचे माजी अध्यक्ष म्हणजेच रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांनी काल म्हणजेच बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. याच्या दोन दिवसाआधी, सोमवारीच त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट टाकली होती. त्यावर लिहिले होते, “धन्यवाद, तुम्ही माझा विचार करता.”
त्यांना पोस्ट का करावी लागली?
ही पोस्ट करण्यापूर्वीच केवळ सोशल मीडियावरच नाही तर अनेक टीव्ही चॅनेल्स आणि वेबसाइट्सवर रतन टाटा यांच्याविषयी एक बातमी सुरू होती. त्यात रतन टाटा यांना रक्तदाब वाढल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. ते आयसीयूमध्ये दाखल असल्याचा दावा करण्यात आला होता. याचे खंडन करण्यासाठी रतन टाटा यांनी ही पोस्ट टाकली होती.