महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 10 ऑक्टोबर ।। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत.मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती nhai.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे. मुदतीपूर्वी इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत कामाचा चार वर्षाचा अनुभव असावा. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ५६ वर्ष असावे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागातील या नोकरीसाठी ग्रेड पे ६६०० अंतर्गत १५६०० ते ३९१००० पगार दिला जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज केल्यानंतर या अर्जाची प्रिंट आउट ऑफलाइन पद्धतीने पाठवायची आहे. DGM (HR/Admin)III, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, प्लॉट नंबर जी५ आणि ६, सेक्टर १०, नवी दिल्ली येथे पाठवायचा आहे.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आयआरसीटीमध्येही नोकरीची संधी आहे. आयआरसीटीसीमध्ये AGM/DGM आणि डेप्युटी मॅनेजर (फायनान्स) या पदांसाठी भरती जाहीर करण्यासाठी आहे. रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २ लाख रुपये पगार मिळणार आहे.