महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 10 ऑक्टोबर ।। तळेगाव दाभाडे ।। भारतीय उद्योग क्षेत्रातील अध्वर्यू रतन टाटा यांच्या निधनामुळे राज्य शासनाने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे येथे आज होणारे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ रद्द करण्यात आले आहेत. आमदार सुनिल शेळके यांनी ही माहिती दिली.
समस्त मावळवासीयांच्या वतीने आमदार शेळके यांनी स्वर्गीय रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
साधी राहणी आणि उच्च विचार असणारा सच्चा राष्ट्रभक्त उद्योगपती हरपल्यामुळे उद्योग क्षेत्राबरोबरच संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले आहे. रतन टाटा यांनी सदैव व्यावसायिक नीतीमूल्य जपत सामाजिक उत्तरदायित्व निभावले. मावळात राहणाऱ्या हजारो कुटुंबांना त्यांच्यामुळे रोजगार मिळाला होता. रतन टाटा यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून सर्वांनी पुढील वाटचाल करावी, हीच त्यांना वाहिलेली श्रद्धांजली असेल, असे आमदार शेळके म्हणाले.
तळेगाव दाभाडे शहरातील 17 कोटी 71 लक्ष निधीतील विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा 10 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेपासून करण्यात येणार होता.यामध्ये तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण देखील करण्यात येणार होते.परंतु
तळेगाव येथे आज (गुरुवारी) होणारे भूमिपूजनाचे कार्यक्रम उद्या (शुक्रवारी) नियोजित वेळेनुसार होतील,असेही त्यांनी स्पष्ट केले.