Amazon Tips : ऑनलाइन शॉपिंग ; अशी लपवा तुमची शॉपिंग हिस्ट्री, हे कमाल फिचर वापरुन बघाच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑक्टोबर ।। Amazon Shopping : ॲमेझॉन आजच्या काळात ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय म्हणून सर्वात लोकप्रिय नाव आहे. एक छोटेसे पुस्तक विक्रेते म्हणून सुरू झालेले ॲमेझॉन आज जवळपास सर्वच प्रकारच्या उत्पादनांचे विक्रीचे एक मोठे प्लॅटफॉर्म बनले आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर सणासुदीच्या खास ऑफर्स सुरू आहेत. अश्यात तुम्ही खूप जास्त खरेदी केलेली अगदी सीक्रेट ठेवायची असेल तर ते शक्य आहे. ॲमेझॉनमध्ये एक खास लपलेले फीचर आहे. ज्याच्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ऑनलाईन शॉपिंग आता भारतात सर्वसामान्य झाली आहे. आपण आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी वस्तू मागवण्यासाठी या सेवांचा वापर करतो. अनेकदा आपण आपल्या प्रीमियम अकाऊंट्स मित्र आणि कुटुंबियासोबत शेअर करतो. पण कधी एखादी खास वस्तू मागवली असते आणि ती इतरांना दिसू नये असे वाटत असेल तर? आता Amazon वर ऑर्डर लपवण्याची सोय आहे. आपल्या ऑर्डर लपवायच्या असतील तर या पुढील स्टेप्स फॉलो करा.

तुमच्या ऑर्डरच्या यादीतून, लपवायची ऑर्डर निवडा. त्या बॉक्सच्या खाली “Archive order” या लिंक दिसेल.

तुमची ऑर्डर आर्काइव्हमध्ये जातेय याची खात्री करण्यासाठी एक कन्फर्मेशन बॉक्स दिसेल.

आता तुमच्या निवडलेल्या ऑर्डर तुमच्या प्रोफाइलवर दिसणार नाहीत.

भारतात ॲमेझॉनने आपली पकड मजबूत केली आहे. फ्लिपकार्टनंतर भारतातील दुसरा सर्वात मोठा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन आहे. भारतात ॲमेझॉनने स्थानिक विक्रेत्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर उत्पादने विक्रीसाठी जागा दिली आहे. यामुळे भारतातील लहान व्यापारी आणि उत्पादक यांना आपले उत्पादन देशभर पोहोचवण्याची संधी मिळाली आहे.

ॲमेझॉन शॉपिंग लवर्ससाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी आहे. भारतातील ऑनलाइन शॉपिंग आता अधिक सोयीस्कर आणि स्मार्ट बनणार आहे. ॲमेझॉनने त्यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित शॉपिंग असिस्टंट “रुफस” (Rufus) भारतात आणलेले आहे. सध्या तो निवडक ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे, पण लवकरच सर्व ग्राहकांना वापरता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *