महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑक्टोबर ।। Gold Price Today: देशभरात सोन्या-चांदीच्या भावात बदल दिसून येत आहे. भारतात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीची चांगली संधी आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर काल त्याची किंमत 70,250 रुपये होती. एकूणच कालच्या तुलनेत आज भाव कमी झाले आहेत.
तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 76,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर काल त्याची किंमत 76,640 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. येत्या काही दिवसांत सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
पुण्यात आज सोन्याचा भाव
सध्या मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत आज सोन्याचा भाव
सध्या मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दिल्लीत सोन्याचा भाव
आज (11 ऑक्टोबर 2024) देशाची राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 70,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,780 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबादमध्ये आजचा सोन्याचा भाव
अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा भाव
चेन्नईमध्ये 1 किलो चांदीची किंमत 99,900 रुपये आहे. तर मुंबईत 93,900 रुपये, दिल्लीत 93,900 रुपये, कोलकात्यात 93,800 रुपये आणि बेंगळुरूमध्ये 84,900 रुपये प्रति किलो आहे.