![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑक्टोबर ।। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दसरा म्हटलं आपण सोनं लुटणं, एकमेकांना शुभेच्छा देणं हे आपण दरवर्षी करत असतो. महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्षे लुटलं जात आहे असे वक्तव्य केले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी समर्थन तर केले पण त्यासोबत त्यांनी चिमटे देखील काढले.
संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना सांगितले की, ‘ते अगदी बरोबर बोलत आहेत. पण ते लुटणाऱ्यांच्या मागे लोकसभेत उभे राहिले होते. सत्ताधारी लुटण्याचा काम करत आहेत. ते महाराष्ट्र लुटणाऱ्या व्यापाऱ्यांचे मागे उभे राहिले त्यांना ते समर्थन देत आहेत. मुंबई लुटण्याचा काम रावण करत आहेत या रावणाचे दहन अखेर होईल. ५०- ५० कॅबिनेटमध्ये घेतले जात आहेत उद्घाटने सुरू आहेत पण त्याने वोट मिळणार नाही.’
आज राज्यात चार दसरा मेळावे होत आहेत. यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, ‘गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळ या देशामध्ये एकच मेळावा होतोय. जिथे विचारांचा सोनं लुटलं जात आहे तो म्हणजे शिवतीर्थावरील सेनेचा दसरा मेळावा. एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा होतो आणि मुंबईमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेळावा होत आहे. आता मेळाव्यांची लाट आली आहे. डुबलीकेट लोकं मिळावे करतात पण ज्याची स्थापना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली ती परंपरा उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवले.’
संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना सांगितरे की, ‘तुम्ही नाव आणि चिन्ह चोरले असेल पण कधीही विचार मूळ शिवसेनेसोबत राहतील. जो निवडणूक आयोग मोदी शहा यांच्यावर चालतो त्यांना शिवसेना कोणाचीही सांगण्याचा अधिकार नाही. आज प्रचाराचा रणशिंग फुंकला जाईल यासमोर पिपाण्या चालणार नाहीत. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे जिंकेल. आमचा धनुष्यबाण मोदी आणि शहांच्या मदतीने चोरला. हा देश चोरांच्या हाती आहे. हुतात्म्यांच्या स्मारकात देखील त्यांच्या हातात मशाल दिसते आणि तीच मशाल जळणार आहे.’![]()
