महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑक्टोबर ।। चावडी चौक येथील मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन व लोकार्पण समारंभ आमदार सुनिल शेळके यांच्या शुभहस्ते (शुक्रवार दि.11) संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार शेळके म्हणाले की, 40 लक्ष निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन स्वतंत्र इमारतींमुळे महसूल विषयक कामकाज अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास सोबतच गावपातळीवरील प्रशासकीय कामकाज उत्तम रीतीने चालावे यासाठी या कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीची आवश्यक होती.विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक यांना महसूल संबंधित सेवा या कार्यालयात सहजपणे उपलब्ध होतील.
या उद्घाटन समारंभास प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, मंडल अधिकारी लिंबराज सलगर, तलाठी कविता मोहमारे, मा.उपनगराध्यक्ष सुरेश चौधरी, मा.नगरसेवक सुरेश दाभाडे, संतोष दाभाडे, विशाल दाभाडे, मयुर टकले, अल्पसंख्याक सेल अध्यक्षा शबनम खान, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा शैलेजा काळोखे,पत्रकार मनोहर दाभाडे व नागरिक उपस्थित होते.
