![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ ऑक्टोबर ।। नुकतीच नवरात्र संपली आणि दसराही महागाईतच पार पडला. सणासुदीत सोन्याच्या दागिन्यांना भरघोस मागणी असल्याने सोन्याचे दर काहीचा काही वाढलेले पाहायला मिळाले. दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने लोकांनी आर्वजून सोन्याचे दागिने बनवतं असल्याने सोन्याचे भाव गगनाला भिडलेले पाहायला मिळाले. सोन्याच्या दरात उतार जरी होत असला तरी भाव काही आवाक्यात नाहीच.
सणासुदीनंतरही दागिने खरेही करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार. दसऱ्याचा शुभ दिवसावर आवर्जून लोक दागिने खरेदी करतात त्यामुळे सोन्याचे भाव वाढलेले पाहायला मिळाले. सणासुदीसोबतच आता लग्नाचा सीझन येणार असल्याने सराफा बाजारात दिवसागणीक सोन्याच्या किंमती नवनवीन उच्चांकच गाठणार आहे. मात्र,आज सोन्याच्या वाढीला ब्रेक लागला असली तरीही हे दर काही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे नाही. २४ कॅरेट सोन्याचा भाव ७७,४०० इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ७०,९५० रुपये आहे. १ किलो चांदीची किंमत ही आज ९६,९०० रुपये इतकी आहे
२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७०,९५० रुपये ७१,१५० रुपये
पुणे ७०,९५० रुपये ७१,१५० रुपये
नागपूर ७०,९५० रुपये ७१,१५० रुपये
कोल्हापूर ७०,९५० रुपये ७१,१५० रुपये
जळगाव ७०,९५० रुपये ७१,१५० रुपये
ठाणे ७०,९५० रुपये ७१,१५० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७७,४०० रुपये ७७,६२० रुपये
पुणे ७७,४०० रुपये ७७,६२० रुपये
नागपूर ७७,४०० रुपये ७७,६२० रुपये
कोल्हापूर ७७,४०० रुपये ७७,६२० रुपये
जळगाव ७७,४०० रुपये ७७,६२० रुपये
ठाणे ७७,४०० रुपये ७७,६२० रुपये
