महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑक्टोबर ।। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार स्वत: शरद पवार जाहीर करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. येत्या 18 ऑक्टोबरला शरद पवार उमेदवारांची पहिली यादी जाहीर करतील अशी माहिती मिळाली आहे. 18 आणि 19 तारखेला यादी जाहीर केली जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आज लागणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आता सगळ्या पक्षांकडून जागावाटप आणि उमेदवार यादी संदर्भातील निर्णय घेण्याबाबत वेगवान घडामोडी सुरू आहेत. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाची पहिली यादी स्वत: शरद पवार जाहीर करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात ही यादी जाहीर केली जाणार आहे. 18 किंवा 19 तारखेला स्वत: शरद पवार विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करतील. या यादीत कोणाची वर्णी लागेल याकडे सगळ्यांचं सगळं लक्ष लागलं आहे.