महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑक्टोबर ।। कढीपत्त्याच्या पाण्यात व्हिटॅमीन ए, बी, सी आणि मिनरल्स असतात. त्याने हे पानी आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी ठरतं.
कढीपत्त्याची पाने थंड असतात. त्यामुळे याचे सेवन केल्याने पोटाला आराम मिळतो. याने पोटात गॅस होण्याच्या समस्या दूर होतात.
कढीपत्त्याचे पानी आपल्या लिव्हरसाठी सुद्धा फायदेशीर आहे. या पाण्यामुळे आपल्याला किडनीशी संबंधित देखील कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.
अनेक महिलांना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याच्या समस्या असतात. या समस्या कढीपत्त्याच्या पानांचे पानी पिल्याने कमी होतात.
सध्या प्रत्येक व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त आहे. तुम्हाला देखील लठ्ठपणा कमी करायचा असेल तर सकाळी कढिपत्ता पाणी पिण्यास सुरुवात करावी.
डायबेटीज असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखर अचानक जास्त होते आणि अचानक कमी होते. त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही याचे सेवन करू शकता.
हृदयविकाराच्या ससमस्या असल्यास त्या व्यक्तींनी देखील नियमीतपणे आपल्या आहारात कढीपत्त्याच्या पानांचे पाणी घेतले पाहिजे.