Ajit Pawar: बारामतीत कोणते ‘पवार’ जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ ऑक्टोबर ।। राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला असलेली बारामती पक्षातील फुटीनंत कोणत्या पवारांची हे सिद्ध करणारी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दोन्ही पक्षांकडून मतदारांना भावनिक आवाहन करण्यात येत आहे. अशात अजित पवारांना कुटुंबातूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे. अशात पवार कुटुंबातील सदस्य कुणाच्या बाजूने उभे राहणार याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे.

दरम्यान यंदा विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

अशी आहे स्थिती
बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या लढत होण्याची दाट शक्यता आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे अजित पवारांसमोर आव्हान उभे करणार आहेत.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना बारामतीत अडकवून ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर बारामतीच्या विकासावरच अजित पवार मते मागणार आहेत.

असे आहेत निवडणूक मुद्दे
बारामती तालुक्यातील पाण्याचा प्रश्न निवडणुकीत डोके वर काढू शकतो. वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, वाढता भ्रष्टाचार या मुद्यावर युगेंद्र पवार यांच्याकडून प्रचार होऊ शकतो. दुसरीकडे बारामतीचा गेल्या पाच वर्षांत झालेला विकास या मुद्यावर अजित पवार यांच्याकडून प्रचार होण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत साडेआठ हजार कोटींचा निधी बारामतीला दिल्याचा मुद्दा प्रामुख्याने निवडणुकीत अजित पवार यांच्याकडून उचलला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *