Amazon-Flipkart Return : अमेझॉन-फ्लिपकार्टच्या रिटर्न पॉलिसीमध्ये मोठा बदल ; आता ..

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ फेब्रुवारी ।। लॉकडाऊन काळानंतर ऑनलाईन शॉपिंगच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. डिस्काउंट ऑफर्स, प्रॉडक्ट व्हरायटी आणि सोप्या पद्धतीने रिटर्न करण्याची सोय यामुळे लोक ऑनलाईन सामान खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, आता अमेझॉन आणि फ्लिपकार्टने आपल्या रिटर्न पॉलिसीमध्ये बदल केले आहेत.

तुम्ही जर ऑनलाईन मागवलेली गोष्ट खराब किंवा तुटलेल्या स्थितीत आढळली, तर ती रिटर्न किंवा रिप्लेस (Online Shopping Return Policy) करता येते. साधारणपणे सात दिवसांमध्ये ती वस्तू तुम्ही अमेझॉन-फ्लिपकार्टला परत पाठवू शकता. यासाठी कंपनीचा किंवा डिलिव्हरी पार्टनरचा कर्मचारी तुमच्या घरी येऊन ती वस्तू घेऊन जातो. मात्र, आता यातच मोठा बदल करण्यात आला आहे.

अमेझॉन-फ्लिपकार्टच्या नव्या रिप्लेसमेंट पॉलिसीनुसार, आता तुम्हाला खराब प्रॉडक्ट रिप्लेस करण्यासाठी थेट कंपनीच्या सर्व्हिस सेंटरवर जावं लागणार आहे. या दोन्ही कंपन्यांनी ठराविक डिजिटल प्रॉडक्टसाठी ही पॉलिसी लागू केली आहे. या प्रॉडक्ट्सच्या खाली 7 Days Replacement ऐवजी आता 7 Days Service Center Replacement असं लिहिलेलं दिसून येईल.

शहरातील सर्व्हिस सेंटर शोधा
हा बदल कित्येक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्ससाठी लागू केला आहे. यामध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इअर बड्स, हेडफोन अशा प्रॉडक्ट्सचा समावेश होतो. जर तुम्हालाही या दोन ई-कॉमर्स साईट्सवरुन असे प्रॉडक्ट मागवायचे आहेत, तर ऑर्डर करण्यापूर्वी रिटर्न पॉलिसी नक्की तपासा. सोबतच तुमच्या शहरात त्या कंपनीचे सर्व्हिस सेंटर आहेत का याचीही खात्री नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *