पुणे ; या भाज्यांच्या भावात वाढ ; अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑक्टोबर ।। गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील तरकारी बाजारात राज्यासह परराज्यांतून येणारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्यांच्या तुलनेत वाढली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने बटाटा, गवार, हिरवी मिरची, शिमला मिरची, बीट आणि घेवड्याच्या भावात वाढ झाली असून अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत.

गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये रविवारी (ता. २०) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक आणि गुजरात येथून हिरवी मिरची ७ ते ८ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, कर्नाटकातून पावटा २ टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, इंदौर येथून ५ ते ६ टेम्पो गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, गुजरात येथून ३ टेम्पो भुईमुगाच्या शेंगा, मध्यप्रदेशातून लसूण सुमारे ७ ते ८ टेम्पो इतकी आवक झाली होती.

तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ५०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो सहा ते साडेसहा हजार क्रेट, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ७ ते ८ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची ७ ते ८ टेम्पो, भुईमुगाच्या शेंगा ४०-५० गोणी, मटार पुरंदर, पारनेर, वाई आणि सातारा परिसरातून ४० ते ५० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा सुमारे ७० ते ८० ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३५ ते ४० टेम्पो आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा नवीन : २५०-३५० जुना : ४००-४५०, बटाटा : २५०-३७०, लसूण : २०००- ३३००, आले सातारी: ५००-१०००, भेंडी : ३००-४००, गवार : ५००-७५०, टोमॅटो : ३००-५००, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ४००-६००, दुधी भोपळा : १००-२५०, चवळी : ३००-४००, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : ५००-६००, पडवळ : २००-३००, फ्लॉवर :२५०-३००, कोबी : १२०-१८०, वांगी : ३००-४००, डिंगरी : ४००-५००, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : ७००-७५०, तोंडली : कळी : ३००-४००, जाड :१५०-१८०, शेवगा : ७००-८००, गाजर : २५०-३५०, वालवर : ५००-६००, बीट : ३००-३५०, घेवडा : ७००-९००, कोहळा : १००- १५०, आर्वी: २००-२५०, घोसाळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंगा : ४५०- ६००, मटार : स्थानिक : १४००-१५००, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.

पालक, पुदिन्याच्या भावात वाढ
बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर, मेथी, अंबाडी, पालक आणि पुदिन्याच्या भावात वाढ झाली असून शेपू, कांदापात, चुका आणि चवळईच्या भावात घट झाली आहे. चाकवत, करडई, मुळा आणि राजगिऱ्याचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात रविवारी (ता. २०) कोथिंबिरीच्या सुमारे ८० हजार जुडी तर मेथीची ५० हजार जुडींची आवक झाली होती. घाऊक बाजारात कोथिंबीर आणि मेथी प्रत्येकी प्रतिगड्डीस पाच रुपये, पालक तीन रुपये, पुदीना दोन रुपये आणि अंबाडी एक रुपयांनी महागली आहे़ तर शेपू आणि कांदापातीच्या भावात प्रत्येकी तीन रुपयांनी घट झाली आहे तर चुका दोन रुपये आणि चवळई एक रुपयाने स्वस्त झाली आहे.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १०००-२०००, मेथी : १५००-२५००, शेपू : ८००-१२००, कांदापात : ८००-१५००, चाकवत : ६००-८००, करडई : ४००- ७००, पुदिना : ५००-१०००, अंबाडी : ५००-८००, मुळा : ८००-१५००, राजगिरा : ४००- ७००, चुका : ५००-८००, चवळई : ३००-७००, पालक : १०००-१८००.

डाळिंब, पपई, पेरूच्या भावात घट
डाळिंब, पपई आणि पेरूच्या भावात घट झाली असून लिंबू, कलिंगड आणि खरबुजाच्या भावात वाढ झाली असून अननस, संत्री, मोसंबी, सीताफळ आणि चिक्कूचे भाव स्थिर होते.

गुलटेकडी येथील मार्केटयार्ड फळबाजारात रविवारी (ता. २०) फळबाजारात मोसंबी ५० ते ६० टन, संत्री २० ते २५ टन, डाळिंब ४० ते ५० टन, पपई २५ ते ३० टेम्पो, लिंबांची सुमारे एक हजार ते दीड हजार हजार गोणी, कलिंगड ४ ते ५ टेम्पो, खरबूज ३ ते ४ टेम्पो, चिक्कू दीड हजार गोणी, पेरू १ हजार ते बाराशे क्रेट, अननस ५ ट्रक, सीताफळ ५० ते ५५ टन इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे – लिंबू (प्रतिगोणी) : ३००-१५००, मोसंबी : (३ डझन) : १५०- ३६०, (४ डझन) : ५५-१४०, संत्री : (१० किलो) : १००-६००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-२००, आरक्ता : २०-६०, गणेश : १०-४०, कलिंगड : १५-२५, खरबूज : २०-४०, पपई : १०-२५, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ३५०-५००.

फुलांच्या भावात दहा टक्क्यांनी घट
गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील फूलबाजारात फुलांना मागणी घटली आहे़. मागणी घटल्याने फुलांच्या भावात दहा टक्क्यांनी घट झाली आहे. पुढील आठवड्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुलांना मागणी वाढणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१५, गुलछडी (सुट्टी) : २५-५०, अ‍स्टर : जुडी १०-२०, सुट्टा: ८०-१००, शेवंती : २०-३०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ४०-८०, जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०-१२०, शेवंती काडी ८०-१२०, लिलियम (१० काड्या) ७००-८००, आॅर्चिड ३००- ४००, जिप्सोफिला : ६०-१००, जुई : ३००-४००.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *