Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला मिळणार …….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑक्टोबर ।। प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सरकारी किंवा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात पैशाची अडचण येणार नाही. पोस्ट ऑफिसची अशीच एक योजना म्हणजे सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम.

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात फायदा होतो. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला काही ठरावीक अमाउंट मिळणार आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्ही पाच वर्षांपर्यंत २०,५०० रुपये मिळवू शकतात. (Post Office Scheme)

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्ही दर महिन्याला २० हजार रुपये कमवू शकतात. या योजनेत आतापर्यंतचे सर्वात जास्त ८.२ टक्के व्याजदर दिले जाते. हे व्याजदर तिमाही आधारावर दिले जाते. या योजनेत मॅच्युरिटी पाच वर्षांची असते.परंतु त्यानंतरही तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत ६० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक एकरकमी गुंतवणूक करु शकतात.

या योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत जर तुम्ही ३० लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला २,४६,००० रुपयांचे व्याज प्रत्येक वर्षाला मिळेल. त्यामुळे या योजनेत तुम्हाला नियमित इन्कम मिळणार आहे. (Post Office Senior Citizen scheme)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस योजनेत किंवा बँकेत जाऊन अरज करावा लागेल. या योजनेत ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *