महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑक्टोबर ।। भाजपची विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात खासदार श्रीजया चव्हाण यांना भाजपकडून भोकर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसंच, भोकर हा चव्हाणांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. आता अशोक चव्हाण यांच्या मुलीला तिकिट देण्यात आले आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण नंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी त्यांचा राजकीय वारसा चालवला. आता चव्हाणांनी विधानसभेच्या निमित्ताने त्यांचा राजकीय वारस घोषित केला आहे. श्रीजया चव्हाण या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत.
अशोक चव्हाण यांनी श्रीजया आणि सुजया या दोन मुली आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानादरम्यान चव्हाण काँग्रेसमध्ये होते. तेव्हा गांधींच्या स्वागताच्या बॅनरवर श्रीजयांचे फोटो झळकले होते. तर, मतदारसंघात श्रीजया चव्हाण यांचे भावी आमदार म्हणूनही बॅनर झळकले होते.
श्रीजया चव्हाण या पेशाने वकील आहेत. त्याचबरोबर त्या भाजप युवा मोर्चाचे काम करत आहेत. भाजयुमोने विकसित महाराष्ट्रासाठी आयडिया हा कार्यक्रम त्यांनी सुरु केला आहे.
26 मे रोजी त्यांचा वाढदिवस असतो. दरम्यान त्यांच्या वाढदिवशी मतदारसंघात भावी आमदार असे हॉर्डिंग झळकले होते.
भोकर मतदारसंघातही त्या गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत होत्या. जनसंपर्क वाढवताना दिसत होत्या