Good News! पुण्याला मिळणार आणखी 4 वंदे भारत एक्स्प्रेस, ‘या’ मार्गावर धावणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑक्टोबर ।। पुण्याला आणखी चार नव्या वंदे भारत मिळणार आहेत. पुण्यातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी, मुंबई ते सोलापूर अशा तीन वंदे भारत सध्या पुणे शहरातून सुरू आहेत. आता त्यात आणखी तीन वंदे भारतची भर पडणार आहे. त्यामुळं पुणेकरांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यासाठी आणखी चार नव्या वंदे भारतची भर पडली आहे. त्यामुळं पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते बेळगाव या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. वंदे भारत सुपरफास्ट ट्रेन असल्यामुळं पुणेकरांचा प्रवास सुस्साट होणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस 2019मध्ये सुरू झाली आहे. तर, आतापर्यंत राज्याला 11 नवीन वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या आहेत.

महाराष्ट्राला आतापर्यंत 11 नवीन वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या आहेत. तर, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राला आणखी सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहेत. सध्या राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही काळात मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, मुंबई ते कोल्हापूर या मार्गांवर आगामी काळात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकतात, असं समोर येत आहे.

कोल्हापूर-पुणे वंदे भारत तिकिट दर
कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापूर स्थानकावरून सुटणार आहे. दुपारी दीड वाजता ही गाडी पुणे स्टेशनवर पोहोचणार आहे. तर पुण्यावरून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवार दुपारी ही गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटणार आहे ती सायंकाळी 7:40 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानाकावर पोहचणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आठ कोच आहेत. कोल्हापूर-पुणे या प्रवासाचे दर चेअर कारसाठी 1160 रुपये तर एक्झिक्युटिव्हसाठी 2005 रुपये असं तिकिट आहे. वंदे भारतमुळं कोल्हापूरकरांचा प्रवास सुस्साट होणार आहे. 5 तासांत प्रवास पूर्ण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *