IND vs NZ 2nd Test: न्यूझीलंड ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल : 12 वर्षांनंतर भारतात पहिल्यांदाच असं घडणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑक्टोबर ।। भारतीय संघावर भारतात कसोटी मालिका गमावण्याचं संकट आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु असलेला सामना भारतीय संघासाठी करो या मरो सामना आहे. या सामन्यातही भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले आहे. हा सामना जिंकून न्यूझीलंडकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंडने १०३ धावांची मोठी आघाडी घेतली आहे.प पुण्याची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर चौथ्या डावात २०० धावांचा पाठलाग करणंही कठीण असेल.

न्यूझीलंडने आतापर्यंत २५० हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाला ३०० पेक्षा अधिक धावांचं आव्हान मिळणार, हे जवळजवळ निश्चित आहे. हे आव्हान गाठणं भारतीय संघासाठी मुळीच सोपं नसणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ ही मालिका जिंकणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे.

न्यूझीलंड इतिहास रचणार
मालिकेतील पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून न्यूझीलंडला मालिका २-० ने जिंकण्याची संधी असणार आहे. त्यामुळे भारतीय संघावर २०१२ नंतर पहिल्यांदाच मायदेशात खेळताना कसोटी मालिका गमावण्याचं संकट असणार आहे. २०१२ मध्ये इंग्लंडने भारतात खेळताना भारतीय संघाला पराभूत केलं होतं.

इंग्लंडविरुद्धचा पराभव हा भारताचा भारतात कसोटी मालिका खेळताना शेवटचा पराभव होता. त्यानंतर भारतीय संघाने एकही सामना गमावलेला नाही. एमएस धोनीनंतर विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचं नेतृ्त्व केलं. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. मात्र आता रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ कसोटी मालिका गमावण्याच्या वाटेवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *