Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिना १२५००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑक्टोबर ।। सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. नॅशनल डिसास्टर मॅनेजमेंट ऑथिरिटीमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागात प्रोजेक्ट स्पेशलिस्ट, प्रोजेक्ट असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफसह अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ndma.gov.in या साइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. (Government Job)

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने मान्यताप्राप्त बोर्डातून बॅचलर डिग्री/इंजिनियरिंगमध्ये मास्टर्स पदवी / बीई/ बीटेक / डिसास्टर मॅनेजमेंटसंबंधित क्षेत्रात मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला हिंदी आणि इंग्रजी भाषा येणे गरजेचे आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असावी. प्रोजेक्ट मॅनेजर आणि टेक्निकल प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी उमेदवारांना १,२५,००० रुपये पगार मिळणार आहे. प्रोजेक्ट असिस्टंट पदासाठी ३७,७४० रुपये तर एमटीएस पदासाठी २५,५०२ रुपये पगार मिळणार आहे. (Disaster Management Authority Recruitment)

या नोकरीसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून पुढील २० दिवसांमध्ये उमेदवारांना अर्ज करायचा आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नॅशनल डिसास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटी, एनडीएमए भवन, ए-१ सफदरजंग एनक्लेव, नवी दिल्ली-११००२९ येथे अर्ज पाठवायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *