महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑक्टोबर ।। दिवाळीचा अवघे काही दिवस उरले आहेत. दिवाळीला सर्वांच्या घरी फराळ बनवला जातो. घराघरात फराळ बनवण्यासाठी सुरुवात झाली आहे. फराळात सर्वात जास्त सुकामेवा वापरला जातो. सध्या सुका मेव्याचे भाव वाढले आहेत. त्याचसोबत तेल, तूप, रवा साखर, खोबरे यांच्याही दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.
तेल,तूप, साखर, गूळ, रवा यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुका मेव्याच्या किंमतीत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या काजू घाऊक बाजारात ८९५ रुपये प्रतिकिलोवर विकले जात आहे.
सध्या किरकोळ बाजारात काजूचे दर १,१०० रुपये आहे. चोरोळीचा दर २,५०० रुपये आहे. वेलची ३,००० किलोवर विकली जात आहे. खजूर किरकोळ बाजारात २०० रुपयांवर विकले जात आहे. पिस्ता घाऊक बाजारात १०९० रुपयांवर विकले जात आबे. तर किरकोळ बाजारात १८०० रुपये प्रति किलोवर विकले जात आहेत.
घाऊक बाजारात मनुके २०० रुपयांवर विकले जात आहे तर किरकोळ बाजारात ३०० रुपये किलोवर विकले जात आहे. सुका मेव्यासह फराळाचे साहित्य महाग झाले आहे. त्यामुळे आता सुका मेवा घेताना खरेदीदारांच्या खिशाला चांगला फटका बसला आहे. (Dryfruits Price Increases)
तेल, खोबऱ्यांसह डाळीदेखील महाग झाल्या आहेत. सध्या मिठाईपेक्षा सुका मेव्याचे भाव जास्त आहेत. अनेकजण नातेवाईकांना सुका मेवा गिफ्ट म्हणून दिले जातात.सुका मेव्याच्या बॉक्सच्या किंमती ५०० रुपयांपासून सुरु आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगला फटका बसला आहे.