महाराष्ट्र 24 : ऑनलाईन : दिनांक 28 : चिंचवड विधानसभेसाठी माजी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी दळवी नगर येथून मोरया गोसावी चाफेकर स्मारक यांचे दर्शन घेत बाईक रॅलीने महापालिकेचे ‘ग प्रभाग’ पर्यंत शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला.
थेरगाव येथील ग क्षत्रिय कार्यालय येथील निवडणूक अधिकारी यांच्याकडे आपला अर्ज भरला. पहिला उमेदवारी अर्ज नाना काटे अपक्ष म्हणून अर्ज भरला. यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे, गणेश लंगोटे, नरेंद्र भोईर यांच्यासह निवडक पदाधिकारी समवेत अर्ज भरला.
यावेळी बोलताना भोईर म्हणाले, जनतेने योग्यता आहे अशा उमेदवारीला मतदान करावें. बोकळलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठीही सत्याची लढाई आहे. जनता सुज्ञ आहे एकदा का जनतेने निवडणूक हातात घेतली तर पैशाच्या मोहाला बळी न पडता सत्याच्या पाठीमागे राहतात. हे जनता दाखवून देते. आपण मोरया गोसावी यांच्या साक्षीने चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहे, जनता मला पाठिंबा देईल असा विश्वास भाऊसाहेब यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
भोईर यांनी रॅली काढत असताना नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. ठिकठिकाणी फटाके फोडून त्याचे स्वागत करताना महिलांनी औक्षण केले. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. युवकांचा प्रचंड उत्साह यावेळी दिसून आला. आज चिंचवड विधानसभेतील अनेक इच्छुकांचे अर्ज दाखल होणार आहेत. त्यामुळे ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालय परिसरात मोठी गर्दी पहायला मिळाली. आज सकाळच्या सत्रात सुरुवातीचा अर्ज माजी नगरसेवक नाना काटे यांनी भरला त्यानंतर भाऊसाहेब भोईर यांनी अर्ज दाखल केला आहे.