महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ता. १ ऑगस्ट -ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अर्थात आज 1 ऑगस्ट पासून अनेक नियमात बदल होणार आहे.कोणते आहेत हे बदल जाणून घेऊया…
1. उद्यापासून कार आणि दुचाकी संबंधित विम्याचे नियम बदलणार आहेत. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने जारी केलेल्या नवीन नियमानुसार नवी गाडी (दुचाकी अथवा चार चाकी) साठी घेतला जाणारा थर्ड पार्टी आणि Own damage जो तीन वर्ष किंवा पाच वर्षासाठी घ्यावा लागत होता तो घेण्याची गरज असणार नाही.
2. बँकेतील खात्यातील किमान रक्कमेबाबत (मिनिमम बॅलेंस) एक ऑगस्टपासून नियम बदलले जाणार आहेत. ऍक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, आरबीएल बँक एक ऑगस्टपासून नियमात बदल करणार आहेत. यातील काही बँका कॅश काढण्यावर आणि जमा करण्यावर शुल्क आकारणार आहेत. तर काही जमा किमान रक्कमेची मर्यादा वाढवणार आहेत.
3. पंतप्रधान किसन योजनेचा दुसरा हप्ता उद्या 1 ऑगस्टपासून जमा केला जाणार आहे. या योजनेनुसार देशातील नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात एक वर्षात दोन हजार या हिशोबाने सह हजार रुपये जमा केले जातात. २०२० मधील पहिला रक्कम एप्रिल महिन्यात देण्यात आली होती.
4. इ कॉमर्स कंपन्यांसाठी 1 ऑगस्टपासून नवे नियम लागू होणार पासूम आता ते विकत असलेल्या वस्तू कोणत्या देशात तयार केल्या जातात याची माहिती द्यावी लागणार आहे. देशातील ग्राहकांना विकाव्या लागणाऱ्या वस्तू आणि सेवांवर त्याची निर्मिती कोणत्या देशात झाली याचा उल्लेख करावा लागेल. हा नियम इलेक्ट्रॉनिक विक्रेत्यांना देखील लागू होणार असून संबंधित वस्तूवर शुक्लासह अन्य माहिती द्यावी लागेल. तसेच वस्तूची एक्सपायरी डेटचा उल्लेख करावा लागणार आहे.
5. आरबीएलने नुकतेच बचत खात्यातील व्याज दरात बदल केले होते. आता आणखी काही बदल केले जाणार आहेत 1 ऑगस्ट पासून बँकेचे डेबिट कार्ड हरवले तर नव्या कार्डसाठी 200 रुपये, कार्ड खराब झाले तर 100 रुपये द्यावे लागणार आहेत, तर डेबिट कार्डसाठी वर्षाला 250 रुपये द्यावे लागतील. तसेच मेट्रो, अर्बन, सेमी-अर्बन आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना एका महिन्याला फक्त 5 फ्री एटीएम व्यवहार करता येतील.
6. 1 ऑगस्टपासून घरगुती (LPG) गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होणार आहेत. देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपपीजी गॅस सिलिंडच्या किमतीत बदल करते. त्यामुळे यात वाढ होते की घट हे पाहावे लागेल.
7. कोरोना संकट काळात सरकारने 25 मार्च 2020 ते 30 जून 2020 या काळात ज्या मुली 10 वर्षाच्या होतील त्यांना 31 जुलै पर्यंत सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते सुरू करण्याची संधी आहे. गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांनी मुलीला ओझे म्हणून पाहू नये यासाठी या योजनेची सुरूवात केली होती.
8. लॉकडाऊन काळात पोस्ट विभागाने पीपीएफ (PPF) सह सर्व छोट्या बचत योजनामध्ये निश्चित केलेल्या मुदतीत पैसे जमा न केल्यास दंड रद्द केला होता. भविष्य निर्वाह निधी, रिकरिंग डिपॉझिट सारख्या योजनेमध्ये विना दंडासह 31 जुलैपर्यंत किमान रक्कम टाकता येईल. दंडा शिवाय रक्कम भरण्यासाठीची मुदत 30 जून होती ती वाढवून आता 31 जुलै करण्यात आली. 1 ऑगस्ट पासून नेहमीचे नियम लागू होतील.
9. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) आर्थिक वर्ष 2019-20 साठी पीपीएफ, एनपीएस आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट अनुसार इन्व्हेस्टमेंट दाखवण्याची अंतिम तारीख 31 जुलै पर्यंत वाढवली होती. सीपीडीटीने 80 डी नियमानुसार मेडिक्लेम, 80 जी नुसार डोनेशन इन्वेस्टमेंट दाखवण्याची मुदत 31 जुलै पर्यंत वाढवली होती.
10. आर्थिक वर्षात मूळ आणि सुधारित आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2020 रोजी संपणार आहे. याशिवाय 2019-20 च्या 80 सी (LIC, PPF, NSC), 80 डी (मेडिक्लेम), 80 जी (दान) नुसार इनकम टॅक्समध्ये कपातीसाठीचा दावा करण्याची मुदत 31 जुलै आहे.