महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० ऑक्टोबर ।। शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभेची उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज झाले आणि घर सोडून निघन गेले होते. तब्बल ३६ तासांनंतर श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबीयांशी संपर्क झाला. आज पहाटे श्रीनिवास वनगा हे घरी आले. कुटुंबीयांना भेटले आणि ते पुन्हा बाहेर निघून गेले. वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी साम टीव्हीशी बोलताना ही माहिती दिली. वनगा घरी आले घरे पण परत ते बाहेर निघून गेले. वनगा यांनी अज्ञातवासामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अखेर तब्बल ३६ त्यानंतर पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा याचा कुटुंबीयांशी संपर्क झाल्याचे समजते. पहाटे श्रीनिवास तीनच्या सुमारास वनगा हे घरी येऊन कुटुंबीयांना भेटून पुन्हा दोन दिवस बाहेर गेले असल्याची माहिती त्याच्या पत्नी सुमन वनगा यांनी दिली. आपल्याला आरामाची गरज असल्याचं कारण सांगत श्रीनिवास पुन्हा बाहेर गावी जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कुटुंबीयांची चिंता मिटलेली आहे. पालघर विधानसभेसाठी तिकीट नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा हे व्यतीत होऊन कुटुंबीयांना न सांगता घराबाहेर निघून गेले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबीय चिंतेत होते. मात्र श्रीनिवास यांनी घरी येऊन कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांना कुठेतरी दिलासा मिळाला.