महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ऑक्टोबर ।। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण या मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यासमोर शिंदे गटाच्या निलेश राणेंनी तगडं आव्हान उभं केलंय. त्यातच कोणत्याही परिस्थितीत राणेंच्या पराभवाचा वचपा काढण्याचा चंगच निलेश राणेंनी बांधलाय.. तर मी केलेला विकास पाहून कोकणवासीय मलाच विजयी करतील, असा विश्वास वैभव नाईकांनी बांधलाय.
1990 मध्ये काँग्रेस नेते श्रीधर नाईकांची हत्या झाली. ही हत्या राणेंनीच केल्याचा आरोप नाईक कुटुंबाने केला होता. तर नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर श्रीधर नाईकांचा पुतण्या वैभव नाईकांनी 2014 च्या निवडणुकीत राणेंचा पराभव केला. त्यानंतर सलग 2 वेळा विजय मिळवणाऱ्या वैभव नाईकांना आता नारायण राणेंचा मुलगा निलेश राणेंनी आव्हान दिलंय..मात्र 2014 विजयाचं गणित काय होतं..पाहूयात
2014 मधील विजयाचं गणित
वैभव नाईक, शिवसेना, 70 हजार 582 मतं
नारायण राणे, काँग्रेस, 60 हजार 206 मतं
10 हजार 376 मतांनी राणे पराभूत
2019 मध्ये राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा भाजप आणि शिवसेना युती असल्याने राणेंनी आपला समर्थक रणजित देसाईंना मैदानात उतरवलं. त्यावेळी अपक्ष देसाईंनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेत नाईकांसमोर मोठं आव्हान उभं केलं. पाहूयात 2019 मधील निकाल
2019 मधील विजयाचं गणित
वैभव नाईक- 69 हजार 168
रणजित देसाई- 54 हजार 819
नाईकांचा 14 हजार 349 मतांनी विजय
लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंनी आपल्या पराभवाच्या मालिकेला ब्रेक लावला. त्यावेळी कुडाळमधून नारायण राणेंना तब्बल 26 हजार मतांचं लीड मिळालं. मात्र कुडाळ-मालवणची जागा शिंदे गटाकडे असल्याने निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 2014 आणि 2019 च्या लोकसभेत स्वतःचा आणि विधानसभेला वडिलांच्या पराभवाचा निलेश राणे वचपा काढणार की वैभव नाईक हॅट् ट्रिक करणार याकडे लक्ष लागलंय.