Gold Price: सणासुदीत सोन्या ,चांदीच्या किमतींनी मोडले सगळे रेकॉर्ड​

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ऑक्टोबर ।। सोने आणि चांदीच्या किंमतीने अलीकडेच रेकॉर्डवर रेकॉर्ड केले आहेत ज्यामुळे आता सर्वसामान्यांना मौल्यवान धातूची खरेदी परवडणारी राहिलेली नाही. दिवाळीच्या दिवसात सोने खरेदी किंवा गुंतवणूक शुभ आणली जाते त्यामुळे, भाव कितीही असले तरी सराफा बाजारातील गर्दी कमी होत नाही. आता दिवाळीच्या मुहूर्तावर घसरणीनंतर सोन्या आणि चांदीच्या दरांनी हनुमान उडी घेतली. परिणामी किंमती इतक्या तुफान वाढल्या की यंदाच्या दिवाळीत ग्राहकांचे दिवाळेच निघेल असं दिसतंय.

ऐन दिवाळीत सोने-चांदीची गरुड भरारी
सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून सतत चढ-उतार सुरूच असून विक्रमी दरवाढीनंतर या आठवड्याच्या सुरुवातीला किंमती नरमल्या होत्या पण दिवाळीच्या तोंडावर आज मौल्यवान धातूंनी जबरदस्त उसळी घेतली आहे. दिवाळीपूर्वीच जोरदार खरेदीमुळे सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आणि बुधवारी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमतीने १,००० रुपयांची मोठी उसळी घेत प्रथमच ८२ हजार रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी ओलांडली, ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने ही माहिती दिली.

सोन्याच्या दरवाढीचा मागोवा घेत चांदीनेही भाव खाल्ला आणि १३०० रुपयांची उसळी घेऊन विक्रमी पातळी गाठली. ऑल इंडिया बुलियन असोसिएशननुसार, राजद दिल्लीत ९९.९% शुद्धतेचे सोने १,००० रुपयांनी वाढून ८२,४०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या नवीन शिखरावर पोहोचले तर स्थानिक बाजारात ९९.५% शुद्धतेचे सोने १००० रुपयांनी वधारून ८२,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले.

सोन्याची झळाळी वाढण्याचे कारण
अमेरिकेन अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी अस्थिर भू-राजकीय परिस्थितीत दिवाळीदरम्यान वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सनी मोठ्या प्रमाणावर खरेदीला सोन्याच्या किंमतीत झालेल्या तीव्र दरवाढीचे श्रेय व्यापाऱ्यांनी दिले. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे कमोडिटी रिसर्च ॲनालिस्ट मानव मोदी म्हणतात की अमेरिका आणि जपानमध्ये वाढत्या राजकीय अनिश्चिततेसह व्याज दरांवरील अधिक संकेतांच्या अपेक्षेमुळे सोन्याची मागणी वाढली आहे.

गेल्या वर्षी २९ ऑक्टोबरपासून सोन्याचा भाव ३५% वधारला आणि ८२,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला तर एक वर्षांपूर्वी सोन्याचा भाव ६१,२०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. या दरम्यान, सलग पाचव्या दिवशीही चांदीच्या दरात तेजीचा कल कायम राहिला आणि पुन्हा एकदा १.०१ लाख रुपये प्रति किलोवर पोहोचला जो गेल्या ट्रेडिंग सत्रात ९९,७०० रुपये प्रति किलो होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *