Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवली; घरासमोर फोर्स-वन कमांडो तैनात, एसआयडीचा गोपनीय रिपोर्टमध्ये नेमकं काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ नोव्हेंबर ।। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. एसआयडीच्या रिपोर्टनंतर केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गोपनीय रिपोर्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचं बोललं जात आहे.

केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अतिरिक्त फोर्स वनमधील १० ते १२ कमांडो तैनात केले आहेत. फोर्स वनमधील कमांडो हे फडणवीसांच्या घराबाहेर तैनात करण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांना आधीच झेड प्लस सुरक्षा आहे. गुप्तहेर संस्थांना गेल्या काही दिवसात मिळालेल्या सूचनांचे आधारे त्यांच्या सुरक्षिततेत आणखी वाढ करण्यात आलीये. त्या अंतर्गत फोर्स वनचे कमांडो त्यांच्या घरासमोर तैनात करण्यात आले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गट, अजित गट आणि भाजपच्या महायुतीचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. महाराष्ट्रात भाजपलाही बंडखोराचा सामना करावा लागत आहे. या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी बंडखोर नेतेही आमचेच असल्याचे सांगितले. त्यांना समजून घेणे आमचं काम आहे. त्यांच्या डोक्यात राग असेल. पण त्यांचा भाव हा पक्षाप्रति आहे. भाजप बंडखोरांची बाजू समजून घेण्यात यशस्वी होईल, असे फडणवीसांनी सांगितले.

ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं की, भाजपने नवाब मलिक यांच्या उमेदवारीचा विरोध केला होता. फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक यांना उमेदवारी देऊ नये, असं म्हटलं होतं. मात्र, अजित पवारांनी नवाब मलिकांना तिकीट दिलं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, त्यांचा नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध नाही. परंतु त्यांचा प्रचार करणार नाही’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *