महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ नोव्हेंबर ।। देशाच्या कानाकोपऱ्यात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या सणासुदीच्या काळात लोक एकमेकांना भेटवस्तू देतात आणि तुमचे एका व्यक्तीशी खोलवर नाते आहे यावरही अनेक वेळा भेटस्तूची किंमत अवलंबून असते. याशिवाय दिवाळीनिमित्त कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तूही देतात पण, तुम्हाला माहीत आहे का की या भेटवस्तू आणि बोनस तुमच्या खिशावर अतिरिक्त कराचा भार टाकू शकतात? होय, आयकर नियमांतर्गत तुम्हाला दिवाळीला मिलेल्या भेटवस्तूंवर कर भरावा लागतो. कंपनीकडून मिळालेल्या भेटवस्तू आणि बोनस केवळ आनंदच आणत नाहीत तर कर दायित्व देखील वाढवते.
आयकर नियमांनुसार तुमच्या दिवाळी भेटवस्तूचे मूल्य एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा तुमचा बोनस ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल. म्हणेज दिवाळी भेटतुमच्यासाठी आनंद तर आणू शकतेच पण त्यावर कराचा बोजाही वाढू शकतो. दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीकडून भेटवस्तू आणि बोनस मिळाल्याने उत्साह असतो पण आज आम्ही तुम्हाला दिवाळीवर लागू होणारे टॅक्स आणि बोनस व टॅक्स टाळण्याचे मार्ग समजून घेऊया.
भेटवस्तूंवर कधी लागतो गिफ्ट टॅक्स?
आयकर कायदा, १९६१ च्या कलम ५६(२)(x) अंतर्गत करदात्याला मिळालेल्या भेटवस्तूंवर कर आकारला जातो मात्र एखाद्या व्यक्तीला मिळालेल्या सर्व भेटवस्तू कराच्या अधीन नाहीत. आयकर कायदा, १९६२ मधील प्रमुख तरतुदीनुसार विविध भेटवस्तू करमुक्त आहेत. तुम्हाला एका आर्थिक वर्षात ५०,००० रुपयांपर्यंत भेटवस्तू मिळाली तर, त्यावर कोणताही गिफ्ट टॅक्स भरावा लागणार नाही. तसेच भेटवस्तूंवर प्राप्तिकर कोणत्याही एका भेटवस्तूवर लावला जात नाही तर आर्थिक वर्षात मिळालेल्या एकूण भेटवस्तूंवर आकारला जातो.
या लोकांकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर कोणताही कर नाही
जोडीदार, भाऊ किंवा बहीण आणि इतर जवळच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तू करपात्र नाहीत.
वारसा किंवा मृत्युपत्राद्वारे भेट म्हणून मिळालेली मालमत्ता
हिंदू अविभक्त कुटुंबाच्या (HUF) बाबतीत कोणत्याही सदस्याकडून मिळालेली भेट
पंचायत, नगरपालिका, कोणतेही प्रतिष्ठान, विद्यापीठ, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था यांच्याकडून मिळालेली भेट
दिवाळी बोनसवरही आकारला जातो कर
नोकरदार व्यक्तीला कंपनीकडून आर्थिक वर्षात पाच हजार रुपयांपर्यंत मिळालेली कोणतीही भेटवस्तू करमुक्त असते पण त्यापेक्षा जास्त असेल तर ती रक्कम तुमचे उत्पन्न मानले जाईल आणि त्यावर आयकर आकारला जाईल.