राज्यात एका दिवसात १०,७२५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – ता. २ ऑगस्ट – महाराष्ट्रामध्ये आजच्या एका दिवसात १०,७२५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागच्या २४ तासांमध्ये राज्यात ९,६०१ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर ३२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४,३१,७१९ एवढी झाली आहे. यापैकी १,४९,२१४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, तर आजपर्यंत एकूण २,६६,८८३ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.

महाराष्ट्रातील रुग्णांचा बरे होण्याचा दर हा आता ६१.८२ टक्के एवढा झाला आहे, तर सध्याचा मृत्यूदर हा ३.५५ टक्के एवढा आहे. राज्यातला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येण्याचा दर हा १९.६६ टक्के एवढा आहे.

महाराष्ट्रात सध्या पुण्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यामध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९१,९३० एवढी आहे. यापैकी ४३४१० रुग्ण बरे झाले आहेत, तर ४६,३४५ एवढे रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत २,१७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यापाठोपाठ ठाण्यामध्ये कोरोनाच्या सर्वाधिक ऍक्टिव्ह केस आहेत. ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९४,५६४ एवढी आहे, यापैकी ५९,९९१ रुग्ण बरे झाले आहेत, तर ३१,९४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाण्यात आत्तापर्यंत २६२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *