महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – मुंबई – ता. २ ऑगस्ट – अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत मुंबई विभागातील विविध शिक्षण मंडळाच्या 1 लाख 92 हजार 247 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. एसएससी बोर्डाचे यात 1 लाख 72 हजार 357 विद्यार्थी आहेत.
शनिवारी दुपारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायककाड यांच्या हस्ते अकरावी प्रवेशाच्या वेबसाइटचे अनावरण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीकर मुंबई एमएमआर क्षेत्र आणि राज्यातील सहा महापालिका क्षेत्रातील तब्बल 1 हजार 600 कॉलेजांमधील साडेपाच लाख जागांसाठी यंदा केंद्रीय प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यूटय़ुबच्या माध्यमातून अनावरण कार्यक्रमाचे लाइव्ह प्रसारण करण्यात आले.
दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग एक भरता येणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे काँलेज पसंतीक्रम (म्हणजे भाग – 2) भरता येणार आहे. प्रवेशाच्या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचे सादरीकरण असलेला व्हिडिओ प्रवेशाच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आला आहे.
कागदपत्रे ऑनलाइन सादरीकरण
प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना याआधी प्रमाणपत्रांची पडताळणी मार्गदर्शन केंद्राकर जाऊन करता येत होती. पण यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रेही ऑनलाईन सादर करता येणार आहेत. तसेच त्यांना प्रवेश शुल्कही ऑनलाईन भरता येणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.
बोर्डनिहाय नोंदणी केलेले विद्यार्थी
एसएससी 1,72,357
सीबीएसई 7200
आयसीएसई 10,824
आयबी 25
आयजीसीएसई 1260
एनआयओएस 276
इतर 295
एकूण 1,92,247
ग्रेडचे गुणांमध्ये रुपांतर
आयसीएसई आणि आयजीएससीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या ग्रेडचे रूपांतर गुणांमध्ये करण्याची सोय वेबसाइटवर उपलब्ध आहे.
