इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएलचे ) सामने १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात होणे आता निश्चित ; केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. ४ ऑगस्ट – युएईमध्ये होणाऱ्या यंदाच्या आयपीएलचे सामने १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात होणे आता निश्चित झाले आहे. यंदा सर्व सामने सायंकाळी ७.३० वाजल्यापासून खेळविण्यात येतील. मात्र त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्याची आयपीएल संचलन समितीला प्रतीक्षा आहे. ही परवानगी दोन ते तीन दिवसात मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रविवारी रात्री उशिरा आयपीएल संचालन समितीची व्हर्च्युअल बैठक संपली. आयपीएलच्या इतिहासत यंदा पहिल्यांदाच रविवारऐवजी आठवड्याच्या मधल्या दिवशी (वीक डे) आयपीएलचा अंतिम सामना रंगेल. बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंतिम सामना १० नोव्हेंबरला (मंगळवार) होईल. त्याचप्रमाणे यंदा सर्व सामन्यांना सायंकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार असून यंदा एकूण दहा डबल हेडर सामने रंगतील. दुपारचे सामने ३.३० वाजता सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय अमिरात क्रिकेट बोर्डवर सोपविण्यात आला आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेण्यात येईल. विशेष गोष्ट म्हणजे ‘वीक डे’ला अंतिम सामना होणार आहे. याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने सांगितले की, ‘सामन्यांदरम्यान चांगले अंतर ठेवण्याचा प्रयत्न करताना दहा डबल हेडर सामने खेळविण्याचे ठरविले. त्यामुळेच आम्ही १० नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा खेळविण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्यांदाच अंतिम सामना वीक डेला होईल.’ यंदाचे सामने अबुधाबी, शारजाह आणि दुबईतील मैदानांवर होणार आहेत.

स्पर्धेचा कालावधी १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर.
सामना सायंकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होणार.
स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश निषिद्ध. त्यानंतर मर्यादित प्रेक्षकांना मिळू शकतो प्रवेश.
कोरोना परिस्थितीमुळे खेळाडू बदलण्यासाठी संघांवर कोणतीही मर्यादा नसेल.
सर्व संघ २६ आॅगस्टला यूएईला होणार रवाना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *