महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 0८ नोव्हेंबर ।। सोन्याच्या भावात आज 8 नोव्हेंबर रोजी मोठी घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत आज शुक्रवारी सोन्याच्या भावात दोन हजार रुपयांनी घट झाली आहे. देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,500 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,000 रुपये आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आणि स्थानिक मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. तर चांदी 92,900 रुपये आहे. कालच्या तुलनेत चांदीचा भाव तीन हजार रुपयांनी घसरला.
सोन्याचा भाव 2 हजार रुपयांनी का घसरला?
कमकुवत जागतिक भावना आणि स्थानिक ज्वेलर्सकडून मागणी घटल्याने सोन्याच्या किमतींवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. LKP सिक्युरिटीजचे कमोडिटी एक्सपर्ट जतीन त्रिवेदी यांनी सांगितले की, आज रात्री फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या निकालाची बाजार वाट पाहत असल्याने सोन्याचा व्यवहार स्थिर झाला.
यूएस सेंट्रल बँक व्याजदरात 0.25 टक्के कपात करेल अशी अपेक्षा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर, बिटकॉइन आणि स्टॉक मार्केट सारख्या जोखमीच्या मालमत्तेमधील भांडवलाच्या प्रवाहामुळे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याची मागणी घटली आहे. त्यामुळे सोन्यात घसरण झाली.
पुणे, मुंबई, कोलकाता येथे सोन्याचा भाव
24 कॅरेट: ₹78,550 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: ₹71,990 प्रति 10 ग्रॅम