अपक्ष उमेदवाराकडुन ‘रडीचा डाव’ – आमदार सुनिल शेळके

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 : मावळ, ८ नोव्हेंबर – आपल्या प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावात मतदारांकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी खोट्या तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे, या शब्दांत सुनीलआण्णा शेळके यांनी विरोधकांच्या तक्रारीला निकाली काढले.

आमदार शेळके यांनी जाहीर प्रचाराची वेळ संपल्यानंतरही मंगळवारी आढले खुर्द व चांदखेड येथे रात्री प्रचार केल्याची तक्रार विरोधकांकडून शिरगाव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. त्याबाबत आमदार शेळके यांनी पहिली प्रतिक्रिया देत विरोधकांवर प्रतिहल्ला चढवला.

शेळके म्हणाले की, गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे प्रत्येक गावात मतदारांकडून मला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. समोर पराभव दिसू लागल्यामुळे जनतेच्या दरबारात लढण्याऐवजी त्यांनी पोलीस स्टेशनची पायरी चढली आहे. यावरून त्यांचे मनोधैर्य पूर्णपणे खचल्याचे दिसून येते.

जनता मला भेटायला आतुर आहे उत्सुक आहे. माझ्या येण्याची वाट पाहत लोक तासनतास थांबतात. मी पोचल्यानंतर माझ्याशी संवाद साधतात. उमेदवार म्हणून मी निवडणुकीचे सर्व नियम पाळत आहे. विरोधकांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून तसेच खोटेनाटे आरोप करून जनतेची दिशाभूल करू नये, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.

विरोधकांच्या असल्या खेळीला मी फारसे महत्त्व देत नाही. मावळची जनता येत्या 20 तारखेला विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही,असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *