रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश; परिवर्तनाचा दिला कानमंत्र

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 : भोसरी 8 नोव्हेंबर ; महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी तरुणांमध्ये जोश निर्माण केला. उद्योगधंदे वाचवू, रोजगार टिकवू महायुतीला हद्दपार करू असे म्हणत रोहित पवार यांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी ‘तुतारी वाजवणारा माणूस: चिन्हासमोर बटन दाबून अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि.८) युवा नेते रोहित पवार यांनी मतदारसंघातील भोसरी, धावडे वस्ती चक्रपाणी वस्ती, त्यानंतर सायंकाळी निगडी, यमुनानगर हा भाग अक्षरशः पिंजून काढला. तरुणांना सोबत घेऊन
उद्योगधंदे वाचवू, रोजगार टिकवू महायुतीला हद्दपार करू असा कानमंत्र दिला. महायुतीचे सरकार या महाराष्ट्रात उद्योगधंदे टिकू देत नाही. उद्योगधंदे गुजरातला पळवले जातात. तळेगावात येणाऱ्या वेदांता,फॉक्सकॉन प्रकल्पाचे काय झाले हे सगळ्यांनी पाहिले. त्यामुळे आता वेळ आली आहे परिवर्तन घडवण्याची, प्रत्येक विधानसभेतील एकेक शिलेदार महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोहोचल्यानंतरच आम्हा युवकांचे भविष्य ठरणार आहे असे देखील रोहित पवार म्हणाले.
……………………..
युवा कार्यकर्त्यांची ताकद भोसरीमध्ये इतिहास घडवेल
अजित गव्हाणे यांनी केलेल्या परिवर्तनाच्या संघर्षाचे रोहित पवाराकडून कौतुक करण्यात आले. संघर्ष करणाराच इतिहास घडवतो हे आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून शिकलो आहोत. या मतदारसंघातही आपल्याला इतिहास घडवायचा आहे.ज्यामध्ये तरुणांची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीमध्ये सामील झालेले माजी नगरसेवक रवी लांडगे, संतोष लांडगे, सम्राट फुगे
यांसारख्या युवा कार्यकर्त्यांची ताकद अजित गव्हाणे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे गव्हाणे यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास रोहित पवार यांनी निगडीतील पदयात्रेदरम्यान व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *