राममंदिर भूमीपूजन सोहळ्याचा आज गणपती पूजनानं श्रीगणेशा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – अयोध्या – ता. ४ ऑगस्ट – अयोध्येमध्ये होणाऱ्या भूमीपूजनाची सुरुवात आजपासून होणार आहे. आज सकाळी 9 वाजता गणपती पूजन होणार आहे. ही पूजा सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालणार आहे. यात विघ्नहर्ता गणेशाची पूजा करत शुभकार्याची सुरुवात केली जाईल. या पूजेमध्ये 21 पुजारी सहभागी होतील. नंतर उद्या, मंगळवारी रामर्चा पूजन होईल. ही पूजा सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे. ही पूजा जवळपास 5 तास सुरु राहील. यात 6 पुजाऱ्यांचा समावेश असेल. तर 5 ऑगस्टला बुधवारी, शुभमुहुर्तावर राममंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम होईल. या पूजेला देखील मर्यादित पुजाऱ्यांचा समावेश असेल.

अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या यादीत काही बदल करण्यात आले आहे. सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या यादीत 200 नावांचा समावेश होता. आता यादीतील 30 नावं कमी करण्यात आली आहेत. आता 170 जणांनी नवी यादी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं आता पाहुण्यांच्या यादीत नाहीत. या दोन्ही नेत्यांना कार्यक्रमाला येण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे त्यांची नावं यादीतून हटवण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राम मंदिर आंदोलनाशी जोडलेले नेते उमा भारती आणि कल्याण सिंह यांची नावं पाहुण्यांच्या यादीत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाशी जोडलेल्या 10 जणांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबोले, कृष्ण गोपाल, अनिल ओक, लखनौचे प्रचारक अनिल कुमार यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे अलोक कुमार, दिनेश चंद्र आणि मिलिंद यांच्यासह सहा जणांना निमंत्रण आहे. याआधी तयार करण्यात आलेल्या यादीत अयोध्येच्या पाच आमदारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं होतं. मात्र आता केवळ अयोध्या शहराचे आमदार आणि महापौर यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येतील 52 संतांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *