टेको इलेक्ट्राने एक नवीन इलेक्ट्रिक मोपेड केली सादर ; अवघ्या 12 रुपयात धावणार 60 किमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ता. ४ ऑगस्ट – टेको इलेक्ट्राने एक नवीन इलेक्ट्रिक मोपेड सादर केली आहे. या स्कूटरला टेको इलेक्ट्रा साथी नावाने सादर करण्यात आले असून, याची किंमत 57,697 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या वेबसाईटवरून या इलेक्ट्रिक मोपेडचे बुकिंग करता येईल. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून या मोपेडची डिलिव्हरी सुरू होईल.

टेको इलेक्ट्राच्या या इलेक्ट्रिक मोपेडमध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आलेले आहेत. यात एलईडी हेडलाईट, सेंट्रल लॉकिंग सिस्टम, अँटी-थेफ्ट अलार्म, स्मार्ट रिपेयर फंक्शन, फ्रंट आणि रियर बास्केट आणि फास्ट चार्जिंग सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत. साथी मोपेडच्या दोन्ही बाजूला टेलेस्कोपिक सस्पेंशन, ब्लॅक एलॉय व्हिल्ज, 10 इंच ट्यूबलेस टायर आणि ड्रम ब्रेक सारख्या खास गोष्टी देण्यात आल्या आहेत.

कंपनीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यावर स्कूटर 60-70 किमी चालेल. यात BLDC मोटर आणि 48V 26 Ah Li-ion बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरीला फूल चार्ज होण्यासाठी 3-4 तास लागतात. कंपनीनुसार, साथी मोपेडला एकदा चार्ज करण्यासाठी केवळ 1.5 यूनिट वीज लागेल. या प्रकारे स्कूटर अवघ्या 12 रुपयांमध्ये 60 किमी चालेल. याचा टॉप स्पीड ताशी 25 किमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *