महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ नोव्हेंबर ।। सोन्याच्या दरात मागील दिवसांपासून बरीच घसरण सुरुच आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या देशांतर्गत वायदा किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजाराला अपेक्षित विजयानंतर सोन्या आणि चांदीच्या भावाने जवळपास निच्चांक गाठला. मात्र, आज सोने आणि चांदीच्या वायदा किंमतीत वाढ झाली असून सोन्याचे फ्युचर्सचे भाव सुमारे ७५,४६४ रुपये तर, चांदीचा वायदा घसरलेला पाहायला मिळाला. चांदीच्या वायद्याची किंमत ९२,९०० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत.
सोने-चांदीच्या किंमतीत घसरण सुरूच
सोन्याची उतरती कळा आता थांबली आहे. मागील किती दिवसांपासून घसरणीला आता ब्रेक लागला असून सोन्याच्या किंमतीत वाढ सुरु झाली आहे. सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमतीत वाढीसह सुरुवात झाली असून मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा बेंचमार्क डिसेंबर वायदा ११३ रुपयांनी वाढून ७५,५४१ रुपयांवर उघडला तर सोन्याच्या फ्युचर्स किमतीने या वर्षी ७९,७७५ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती.
दुसरीकडे, चांदीच्या वायदा किंमतीत मंदी दिसून आली. MCX वर चांदीचा डिसेंबर वायदा १०० रुपयांनी घसरून ९२,९०० रुपयांवर उघडला तर सोन्या किंमतीसह यावर्षी चांदीच्या दारांनीही विक्रमी पातळी गाठली आणि प्रति किलो एक लाख पार मुसंडी मारली.
२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७२,१९० रुपये ७२,२०० रुपये
पुणे ७२,१९० रुपये ७२,२०० रुपये
नागपूर ७२,१९० रुपये ७२,२०० रुपये
कोल्हापूर ७२,१९० रुपये ७२,२०० रुपये
जळगाव ७२,१९० रुपये ७२,२०० रुपये
ठाणे ७२,१९० रुपये ७२,२०० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७८,७५० रुपये ७८,७६० रुपये
पुणे ७८,७५० रुपये ७८,७६० रुपये
नागपूर ७८,७५० रुपये ७८,७६० रुपये
कोल्हापूर ७८,७५० रुपये ७८,७६० रुपये
जळगाव ७८,७५० रुपये ७८,७६० रुपये
ठाणे ७८,७५० रुपये ७८,७६० रुपये