महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ नोव्हेंबर ।। बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. रितेश देशमुख हा काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी सीजन 5 ला होस्ट करताना दिसला. एका वेगळ्याच अंदाजामध्ये रितेश दिसला. पहिल्यांदाच बिग बॉस रितेशने होस्ट केले. विशेष म्हणजे रितेश देशमुखचा अंदाज लोकांना आवडला. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहून लागले आहे. विशेष म्हणजे जोरदार सभा आणि प्रचार सुरू आहे. रितेश देशमुख हा भाऊ धीरज विलासराव देशमुख याच्या प्रचारासाठी मैदानात उतरलाय. युवा मेळाव्यात रितेश देशमुख याने जोरदार भाषण केलंय, ज्याची तूफान चर्चा रंगलीये. अस्सल ग्रामीण शैलीमध्ये रितेशने भाषण केलंय.
या भाषणात रितेश देशमुख विरोधकांवर जोरदार टीका करताना दिसलाय. धर्माच्या नावावरून जे राजकारण सुरू आहे, त्यांच्यावर सडकून टीका रितेशने केलीये. लातूरमधील सभेतील भाषणात रितेश म्हणाला की, सगळे म्हणतात की, धर्म धोक्यात आहे. प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे. धर्माला वाचवा… धर्म बचावो…अहो आमचा धर्म आहे तो आम्हाला प्रिय आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असल्याच पाहिजे.
पुढे रितेश म्हणाला, जे लोक तुम्हाला बोलतात की धर्म वाचवा…जो पक्ष तुम्हाला बोलतो धर्म वाचवा…धर्म धोक्यात आहे…खरं म्हणजे ते देवाला प्रार्थना करतात आमचा पक्ष धोक्यात आहे, आम्हाला वाचवा. काही गरज नाही अशा गोष्टींना बळी पडायची. त्यांना म्हणा धर्माचे आम्ही बघून घेतो, तुम्ही आमच्या कामाचे सांगा. धर्माचे आम्ही बघून घेतो, तुम्ही आमच्या पिकाला काय भाव देता हे सांगा. धर्माचे आम्ही बघून घेतो, आमच्या आई बहिणी सुरक्षित आहेत का ते सांगा.
धर्म धोके में है म्हणणाऱ्यांचा पक्ष धोक्यात आहे, त्यासाठी प्रार्थना करतायत | रितेश देशमुख
रितेश देशमुख या भाषणामध्ये विरोधकांवर जोरदार टीका करताना दिसला. आता रितेश देशमुखचा हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. धीरज भैय्यावर पुढील काळात मोठी जबाबदारी येणार असल्याचे सांगतानाही रितेश देशमुख हा दिसलाय. रितेश देशमुख काही दिवसांपूर्वीच विदेशात आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने खास फोटोही शेअर केले होते. रितेश देशमुख सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसतो. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.