महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. ४ ऑगस्ट -पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.१९ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लिटर ८०.११ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत पेट्रोल ८०.४३ रुपये असून डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे.चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८२.१० रुपये आहे. तर डिझेल ७७.०४ रुपये प्रती लीटर आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ४४ डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे.