महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ नोव्हेंबर ।। सोने चांदीच्या दरातील लहान मोठ्या घडामोडीकडे ग्राहकांचे लक्ष असते. दिवाळी दरम्यान सोने चांदीचे भाव खूप वाढले होते. त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडला होता पण आता सोने स्वस्त झाले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे या आठवड्यात ग्राहक सोने खरेदी करताना दिसू शकतात.
आजचा सोने चांदीचा दर
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६८,१७३ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७४,३७० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ८९३ रुपये आहे म्हणजेच चांदी ८९,२६० रुपये प्रति किलो आहे.
एका आठवड्यापूर्वी सोने चांदीचा दर
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, एका आठवड्यापूर्वी २४ कॅरेटसाठी सोन्याचा दर ७७,५७० रुपये होता, याशिवाय चांदीची किंमत ९१,६०० रुपये प्रति किलो होती. एका आठवड्यात सोन्याच्या दरात ४.१३ टक्के घसरण झाली आहे तर चांदीच्या दरात २.५५ टक्के घसरण झाली आहे.
एका महिन्यापूर्वी सोने चांदीचा दर
एका महिन्यापू्र्वी २४ कॅरेटसाठी सोन्याचा दर ७६,८१० रुपये होता, याशिवाय चांदीची किंमत ९२,३३० रुपये प्रति किलो होती. सोन्याच्या दरात एका महिन्यात ३.१८ टक्के घसरण झाली आहे तर चांदीच्या दरात ३.३३ टक्के घसरण झाली आहे.
१ नोव्हेंबर रोजी दहा ग्रॅम सोन्याचा दर ७८,८६७ रुपये होता आणि गुरुवारी सोन्याचा दर ७३,७५० रुपये होता. या १५ दिवसांमध्ये सोन्याच्या दरात पाच हजार रुपयांची घसरण दिसून आली.