![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ नोव्हेंबर ।। वाढलेलं वजन कमी करणं हे खूप मोठं कठीण काम असतं. मात्र तुमचं वजन जास्त आहे की कमी हे तुम्हाला कसं कळेल? मुळात उंचीनुसार वजनाचा समतोल हा उत्तम आरोग्याचा निकष आहे. जर तुम्हाला फीट आणि फाईन राहायचं असेल तर तुमचं वजन हे तुमच्या वयानुसार आणि उंचीनुसार परफेक्ट असायला हवं. तुमच्या उंचीनुसार,तुमचं वजन किती पाहिजे हे पाहूयात.
शरीराचं वजन आणि उंची यांच्यात एक संबंध आहे, जो बॉडी मास इंडेक्स (BMI) द्वारे तुम्हाला समजू शकतो. शरीराचं वजन जास्त किंवा कमी असणे आरोग्यासाठी चांगले नाही.
जास्त वजन असणं धोकादायक
जास्त वजनामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्याचा तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होतो. शिवाय लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हर, मधुमेह, हार्मोनल असंतुलन, हृदयविकार यांसारख्या समस्या भेडसावण्याची शक्यता असते.
वजन कमी असेल तर
कमी वजनामुळेही देखील अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. शरीराचे वजन सामान्यपेक्षा कमी असल्यास त्याचा परिणाम शरीरातील ऊर्जा, हाडं, स्नायू यांच्यावर होतो.
उंचीनुसार महिलांचं वजन किती असलं पाहिजे
150 cm : सामान्य वजन 43 – 57 किलो
155 cm : सामान्य वजन 45 – 60 किलो
160 cm : सामान्य वजन 48 – 62 किलो
165 cm : सामान्य वजन 51 – 65 किलो
170 cm : सामान्य वजन 54 – 68 किलो
175 cm : सामान्य वजन 57 – 72 किलो
180 cm : सामन्य वजन 60 – 75 किलो
185 cm : सामान्य वजन 63 – 78 किलो
उंचीनुसार पुरुषांचं किती वजन असलं पाहिजे
160 cm : सामान्य वजन 50 – 65 किलो
165 cm : सामान्य वजन 53 – 68 किलो
170 cm : सामान्य वजन 56 – 71 किलो
175 cm : सामान्य वजन 59 – 75 किलो
180 cm : सामान्य वजन 62 – 79 किलो
185 cm : सामान्य वजन 65 – 83 किलो
190 cm : सामान्य वजन 68 – 87 किलो
195 cm : सामान्य वजन 71 – 91 किलो
