महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ नोव्हेंबर ।। पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, रविंद्र धंगेकर यांचं मतदारसंघात वर्चस्व पाहायला मिळत आहे. त्यामुळे कसबा पेठचचे रविंद्र धंगेकर संभाव्य आमदार असू शकतात. असे वृत्त साम टीव्ही ने प्रसारित केले .
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर मैदानात उतरले होते. तर भाजपकडून हेमंत रासने रिंगणात उतरले होते. मनसेनेही या मतदारसंघात उमेदवार दिला होता. त्यामुळे तीन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळाली. एक्झिट पोलनुसार, या लढाईत काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या हेमंत रासने यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावं लागू शकतं.
कसब्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी होती. तरी काँग्रेसचे धंगेकर येथून निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कसब्यात धंगेकर यांच्या विजयाची कारणे समजून घेऊयात. कसब्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख सामना पाहायला मिळाला. या चुरशीच्या लढतीत धंगेकर बाजी मारू शकतात.
मनसेने उमेदवार दिल्याने त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. धंगेकरांच्या प्रतिमेमुळे त्याचा फायदा त्यांना झाला आहे. लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्याचाही फायदा झाला. त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता आहे.