CNG Price Hike: निवडणुका संपताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ नोव्हेंबर ।। सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची आहे. महानगर गॅस लिमिटेडने राज्यातील सीएनजीच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. सीएनजीच्या किंमतींमध्ये २ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडने केलेल्या घोषणेनुसार, राज्यात सीएनजीच्या किंमती २ रुपये किलोग्रॅमने वाढल्या आहेत. मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी या नवीन किंमती लागू करण्यात आल्या आहे. मुंबईत आधी सीएनजीची किंमत ७५ रुपये प्रति किलोग्रॅम होती. त्यानंतर आता यात २ रुपयांनी वाढ झाली असून आता सीएनजी ७७ रुपये प्रति किलोग्रॅमवर विकले जाणार आहे.

सीएनजीच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. सीएनजीच्या किंमती वाढल्याने टॅक्सी, ऑटो रिक्षा चालकांवर चांगलाच परिणाम होणार आहे. टॅक्सी, ऑटो रिक्षा या सीएनजी गॅसवर चालतात. तसेच देशात डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने वाहनचालकांसह प्रवाशांनाही फटका बसू शकतो.

सीएनजीच्या किंमती

दिल्लीत सीएनजीची किंमत ७५.०९ रुपये प्रति किलो आहे.

चेन्नईमध्ये सीएनजीची किंमत ९०.५० रुपये प्रति किलो आहे.

बंगळुरुमध्ये सीएनजीची किंमत ८४.८५ रुपये प्रति किलो आहे.

चंदीगडमध्ये सीएनजीची किंमत ९०.५० रुपये आहे.

हैदराबादमध्ये सीएनजीची किंमत ९२.०० रुपये आहे.

हैदराबादमध्ये सीएनजीची किंमत ९१.४१ रुपये आहे.

पाटण्यात सीएनजीची किंमत ८४.५४ रुपये प्रति किलो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *