हा निकाल महायुतीसाठीही धक्कादायक ; अमित देशमुख यांचे मत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ नोव्हेंबर ।। राज्याचा निकाल हा फक्त महाविकास आघाडीसाठीच नव्हे तर महायुतीसाठीही धक्कादायक आहे असे विधान काँग्रेस नेते आणि लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांनी केले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे फरक पडला असे प्रथमदर्शनी दिसत आहे असेही देशमुख म्हणाले.

माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राचा निकाल हा फक्त महाविकास आघाडीसाठीच नाही तर महायुतीसाठीही धक्कादायक आहे. असे आकडे अभिप्रेत नव्हते. महायुतीला सव्वा दोनशे जागा मिळाल्या आहेत. हे आकलनापलीकडे आहेत. ही संपूर्ण निवडणूक अटीतटीची झाली आहे. लातूर ग्रामीणमध्येही अटीतटीची निवडणूक झाली आणि आमचा पराभव झाला. त्याची कारणं आम्ही शोधू. यातून आम्ही नाऊमेद होणार नाही. आम्ही काम करत राहू. लाडकी बहीण योजनेचा परिणाम झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे असे देशमुख यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *